पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना: 4,000 रूपये एकत्र खात्यावर जमा होण्यास सुरुवात

राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा २२ वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहेत. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी आता राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी’ योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असल्याची माहिती पाहायला मिळते आहे.

PM किसान योजनेचा २२ वा हप्ता जमा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ मार्च २०२६ रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता थेट हस्तांतरित (DBT) करण्यात आलेला आहे.

  • लाभार्थी संख्या: देशातील जवळपास ९.३२ कोटी शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यात आलेला आहे.
  • वितरित निधी: केंद्र सरकारने एकूण १८,६४० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.
  • रक्कम: पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा झाले आहे.

नमो शेतकरी योजना: 2000 रूपये हप्ता कधी मिळणार?

पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ६००० रुपये आणि राज्य सरकारकडून ६००० रुपये अशी एकूण १२००० रुपयांची वार्षिक मदत मिळते. २२ वा हप्ता जमा झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या हप्त्याकडे लागलेले आहेत.

ताज्या रिपोर्ट माहिती नुसार:

  • निधी मंजूर: राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये या योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे.
  • संभाव्य तारीख: सहसा पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर ८ ते १५ दिवसांच्या आत राज्य सरकारचा हप्ता जमा होत असतो. त्यामुळे मार्च २०२६ च्या अखेरपर्यंत नमो शेतकरी योजनेचे २००० रुपये खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहेत.

तुमच्या खात्याचा Status असा तपासायचे आहे

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करायचे आहे: १. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जायचं आहे. २. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करावे. ३. तुमचा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाकायचे आहेत. ४. कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करावे.

हप्ता रखडला असल्यास ‘हे’ काम लगेच करा

जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील, तर खालील तांत्रिक बाबी तपासायचे:

  • e-KYC: तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करावी.
  • Aadhaar Linking: तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक (DBT Enabled) असणे अनिवार्य आहेत.
  • Land Seeding: तुमच्या अर्जामध्ये जमिनीची नोंद (Land Seeding) ‘Yes’ असल्याची खात्री करावी.

निष्कर्ष

पीएम किसानच्या २२ व्या हप्ता 2000 रूपये शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठा आधार मिळाला आहेत. राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळणार आहेत.

Leave a Comment