राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत १५ मार्च २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणलेली आहेत. ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही, त्यांच्यासाठी ही बातमी आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची आहेत.
लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये कधी मिळणार आहे?
मागच्या २ महिन्यांपासून अनेक भगिनी जानेवारी २०२६ नंतरचा हप्ता जमा न झाल्यामुळे चिंतेत असल्याचे पाहायला मिळालेले होते. शासनाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार:
- एकत्रित हप्ता: फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये एप्रिल महिन्यात एकत्रितपणे दिले जाणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.
- तारीख: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच १५ एप्रिल २०२६ च्या आत हे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी सकाळी टीव्ही नाईन शी बोलताना सांगितल.
- बँक खाते: महिलांनी आपले बँक खाते ‘Active’ ठेवणे आणि ते आधारशी लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहेत.
या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे!
एकडे ३००० रुपये मिळण्याची शक्यता असताना, दुसरीकडे हजारो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची चिंतेची बाब समोर आली आहे.
- e-KYC डेडलाईन: ज्या महिलांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाहीत, त्यांचा १५०० रुपयांचा दरमहा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे
- पडताळणी: १० एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान अर्जांची कडक पडताळणी होणार असून, ज्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आहेत किंवा ज्यांनी केवायसी केलेले नाही, त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे.
अपात्रतेचे महत्त्वाचे निकष (Check List)
तुमचा लाभ सुरू राहावा असे वाटत असेल, तर खालील निकष तपासायचे आहे. या निकषांत बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे: १. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास. २. वयोमर्यादा: लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यावर. ३. सरकारी लाभ: केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत असल्यास. ४. कुटुंबातील लाभार्थी: एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यास (केवळ दोनच महिलांना लाभ मिळतो). ५. वाहने: ज्या कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचा ३००० रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण असल्याची खात्री करावी. १५ एप्रिलपर्यंत पात्र भगिनींच्या खात्यात हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याच्या सामान्य विभाग माध्यमातून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.